सकल सारस्वत समाजाचे प्रतिबिंब

All Donations (except cash donations above Rs.2000/-) are eligible for 50% exemption from Income Tax under Sec. 80G of the Income Tax Act, 1961 vide Regn. No. AAGTS6431DF20231 dtd. 28-02-2023 of the Director of Income Tax Exemption) Mumbai valid till 31-03-25 PAN NO.: AAGTS64310

शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद व्यापिनीम्ब ।
वीणापुस्तक धारिणीभयदी जाड्यन्धकरापहाम।
हस्ते स्फटिकमालिकां च दधतीं पद्मासने संस्थिताम ।
वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदी शारदाम ।।

शुद्धा , ब्रम्हविचारसाररुपी, परम, आद्य, जगाला व्यापणाऱ्या,
वीणा पुस्तक धारण करणाऱ्या, अभय देणाऱ्या, बुद्धिमंदतेचा
अंधकार नष्ट करणाऱ्या, हातात स्फटिकमाला धारण
करणाऱ्या, पद्मासनात बसलेल्या, बुद्धी देणाऱ्या ,
त्या परमेश्वरी भगवती शारदेला वंदन असो !

News

ध्येय व कार्य

अधिक माहिती

प्रकाशने

अधिक माहिती

चैतन्य गौरव

अधिक माहिती

आमच्या विषयी

ऑगस्ट - सप्टेंबर १९८५; सुधाकर लोटलीकर, प्रमोद तेंडुलकर आणि विकास सिनकर हे तरुण समाजासाठी काही तरी करायला हवे पण सध्या जे इतर करताहेत त्यापेक्षा वेगळे करावे ह्या वेडाने झपाटले होते. तेंव्हा अखिल गौड सारस्वत ब्राह्मण समाजासाठी सर्व ज्ञातिघटकांना सामावून घेणारे असे नियतकालिक नाही असे त्यांच्या ध्यानात आले. तेंव्हा...

पुढे वाचा

आजवरची वाटचाल
सारस्वत परिचय ग्रंथाचे प्रकाशन डॉ. प्रेमानंद रामाणी, श्री. जयराज साळगांवकर, श्री किशोर रांगणेकर यांच्या हस्ते तेंडुलकर हॉल, माहीम येथे प्रकाशन
श्री अशोक सिनकर लिखित 'मी ची शोध यात्रा- मैय्येच्या सान्निध्यात' या नर्मदा परिक्रमे दरम्यान आलेले अनुभव व घडलेले मानसिक परिवर्तन टिपणाऱ्या पुस्तकाचे पुणे येथे सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल श्री. प्रदीप नाईक यांच्या हस्ते प्रकाशन.
सारस्वत चैतन्य रौप्य महोत्सवी सोहळा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, माटुंगा येथे ज्योतिर्भास्कर श्री जयंतराव साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली. अनेक मान्यवरांचा गौरव जसे - श्री मंगेश पाडगांवकर- प्रसिद्ध कवी, श्री. मधू मंगेश कर्णिक- प्रसिद्ध साहित्यिक, श्री. द. म. सुकथनकर - सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर प्रेमानंद रामाणी, डॉक्टर जी. बी. परुळकर, श्री शरु रांगणेकर- व्यवस्थापन तज्ज्ञ, श्री. बापूसाहेब रेगे- शिक्षणतज्ज्ञ, श्री माधव मंत्री- क्रिकेटर, श्री रामदास कामत- नट व गायक, श्री अमृत मंत्री- संशोधक, श्रीम. गिरीजा कीर- साहित्यिक, श्री कमलाकर नाडकर्णी- नाट्य व कला समीक्षक, श्री. शा.मं.गोठोस्कर -पत्रकार, श्री जयराज साळगावकर- उद्योजक आणि श्री अजित गुंजीकर- उद्योजक.
सारस्वत चैतन्य द्वि-दशक पूर्ती समारंभ, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम. प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक श्री मधू मंगेश कर्णिक.
सारस्वत - भारतीय संस्कृतीचे उपासक या पत्रकार व अर्थतज्ञ श्री. गो. मं. लाड लिखित ग्रंथाचे, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे,ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण टिकेकर यांच्या हस्ते प्रकाशन. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री के. ज. पुरोहित व प्रसिद्ध उद्योजक श्री गजानन तिरोडकर यांची उपस्थिती.
प्रथम सारस्वत चैतन्य गौरव सोहळा, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे साजरा झाला. प्रमुख पाहुणे थोर समाजसेवक डॉक्टर बी. बी. गायतोंडे होते.
सारस्वत चैतन्य दशकपूर्ती समारंभ व गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञाती बंधू-भगिनींचे संमेलन - दामोदर नाट्यगृह , परळ, मुंबई. श्री अनिल काकोडकर, संचालक भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या अध्यक्षतेखाली. प्रमुख पाहुणे - श्री एस. ए. कामथ, अध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र व श्री प्र. वा. रेगे, शिक्षण तज्ज्ञ. श्री सद्गुरू वामनराव पै संमेलनाचे उदघाटक होते. वर्षभरात ज्या समाजबांधवांचा राज्य वा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला अशा १५ जणांचा गौरव करण्यात आला आणि ज्यांनी वयाची ७५ गाठली व एक तपाहून जास्त सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे अशा ३१ जणांचा सत्कार करण्यात आला.
गौड सारस्वत समाज परिचय ग्रंथाचे श्री सुरेश नाडकर्णी, अध्यक्ष, सेबी यांच्या हस्ते बाल मोहन विद्यामंदिर, दादर येथे प्रकाशन. उपस्थित मान्यवर श्री द. म. सुकथनकर राज्याचे माजी मुख्य सचिव व श्री सुरेश प्रभू, अध्यक्ष सारस्वत बँक.
संस्थेची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० (१९५० चा मुंबई अधिक्रमांक २९) अन्वये नोंदणी. नोंदणी क्रमांक: ई - १३३६४ (मुंबई)
गुढी पाडवा - सुप्रसिद्ध साहित्यिक श्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सारस्वत चैतन्याच्या प्रथम अंकाचे बालमोहन विद्यामंदिर दादर येथे प्रकाशन.
गेल्या वर्षभरात
गौरव सोहळा २०२२ विशेष अतिथी मा. श्री. आर. वि. शानभाग कै. गोविंद मंगेश लाड स्मृति पुरस्कार - ज्येष्ठ पत्रकार - श्री. नारायण हरळीकर सारस्वत चैतन्य गौरव सोहळा - विशेष उपस्थिती - मा. श्री. किशोर रांगणेकर सारस्वत चैतन्य गौरव सोहळा - विशेष उपस्थिती - मा. श्री. सतीश वाघ सारस्वत प्रकाशन पुरस्कार, जेष्ठ उद्योजक - श्री. रघुनंदन कामथ समाजसेवक कै. रवींद्र पाटकर स्मृती पुरस्कार नेफ्रॉलॉजिस्ट-रेनल स्पेशलिस्ट - डॉ. श्रीरंग बिच्चू कै. एम. एन. देसाई स्मृती पुरस्कार - कलाकार - श्री. प्रफुल्ल सामंत कै. व्हि. डी. पाडगांवकर स्मृति पुरस्कार -संस्था - राजापूर सारस्वत संघ मुंबई सारस्वत प्रकाशन विशेष सत्कार सामाजिक कार्य - श्री डी. एन. नाडकर्णी सारस्वत प्रकाशन विशेष सत्कार सामाजिक कार्य - श्री. राजेंद्र पाडगांवकर

अधिक माहिती

आश्रयदाते-आधारस्तंभ व्हा

सारस्वत प्रकाशन विश्वस्त संस्था

Copyrights 2018 © Saraswat Prakashan, All rights reserved.
Website Developed By digideas.com