सकल सारस्वत समाजाचे प्रतिबिंब

All Donations (except cash donations above Rs.2000/-) are eligible for 50% exemption from Income Tax under Sec. 80G of the Income Tax Act, 1961 vide Regn. No. AAGTS6431DF20231 dtd. 28-02-2023 of the Director of Income Tax Exemption) Mumbai valid till 31-03-25 PAN NO.: AAGTS64310

ध्येय व कार्य

अधिक माहिती

प्रकाशने

अधिक माहिती

चैतन्य गौरव

अधिक माहिती

आजवरची वाटचाल
सारस्वत परिचय ग्रंथाचे प्रकाशन डॉ. प्रेमानंद रामाणी, श्री. जयराज साळगांवकर, श्री किशोर रांगणेकर यांच्या हस्ते तेंडुलकर हॉल, माहीम येथे प्रकाशन
श्री अशोक सिनकर लिखित 'मी ची शोध यात्रा- मैय्येच्या सान्निध्यात' या नर्मदा परिक्रमे दरम्यान आलेले अनुभव व घडलेले मानसिक परिवर्तन टिपणाऱ्या पुस्तकाचे पुणे येथे सेवानिवृत्त एअर चीफ मार्शल श्री. प्रदीप नाईक यांच्या हस्ते प्रकाशन.
सारस्वत चैतन्य रौप्य महोत्सवी सोहळा. बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, माटुंगा येथे ज्योतिर्भास्कर श्री जयंतराव साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली. अनेक मान्यवरांचा गौरव जसे - श्री मंगेश पाडगांवकर- प्रसिद्ध कवी, श्री. मधू मंगेश कर्णिक- प्रसिद्ध साहित्यिक, श्री. द. म. सुकथनकर - सेवानिवृत्त सनदी अधिकारी, डॉक्टर प्रेमानंद रामाणी, डॉक्टर जी. बी. परुळकर, श्री शरु रांगणेकर- व्यवस्थापन तज्ज्ञ, श्री. बापूसाहेब रेगे- शिक्षणतज्ज्ञ, श्री माधव मंत्री- क्रिकेटर, श्री रामदास कामत- नट व गायक, श्री अमृत मंत्री- संशोधक, श्रीम. गिरीजा कीर- साहित्यिक, श्री कमलाकर नाडकर्णी- नाट्य व कला समीक्षक, श्री. शा.मं.गोठोस्कर -पत्रकार, श्री जयराज साळगावकर- उद्योजक आणि श्री अजित गुंजीकर- उद्योजक.
सारस्वत चैतन्य द्वि-दशक पूर्ती समारंभ, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम. प्रमुख पाहुणे जेष्ठ साहित्यिक श्री मधू मंगेश कर्णिक.
सारस्वत - भारतीय संस्कृतीचे उपासक या पत्रकार व अर्थतज्ञ श्री. गो. मं. लाड लिखित ग्रंथाचे, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे,ज्येष्ठ पत्रकार श्री अरुण टिकेकर यांच्या हस्ते प्रकाशन. सुप्रसिद्ध साहित्यिक श्री के. ज. पुरोहित व प्रसिद्ध उद्योजक श्री गजानन तिरोडकर यांची उपस्थिती.
प्रथम सारस्वत चैतन्य गौरव सोहळा, तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे साजरा झाला. प्रमुख पाहुणे थोर समाजसेवक डॉक्टर बी. बी. गायतोंडे होते.
सारस्वत चैतन्य दशकपूर्ती समारंभ व गौड सारस्वत ब्राह्मण ज्ञाती बंधू-भगिनींचे संमेलन - दामोदर नाट्यगृह , परळ, मुंबई. श्री अनिल काकोडकर, संचालक भाभा अणुसंशोधन केंद्र यांच्या अध्यक्षतेखाली. प्रमुख पाहुणे - श्री एस. ए. कामथ, अध्यक्ष, बँक ऑफ महाराष्ट्र व श्री प्र. वा. रेगे, शिक्षण तज्ज्ञ. श्री सद्गुरू वामनराव पै संमेलनाचे उदघाटक होते. वर्षभरात ज्या समाजबांधवांचा राज्य वा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला अशा १५ जणांचा गौरव करण्यात आला आणि ज्यांनी वयाची ७५ गाठली व एक तपाहून जास्त सामाजिक वा शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे अशा ३१ जणांचा सत्कार करण्यात आला.
गौड सारस्वत समाज परिचय ग्रंथाचे श्री सुरेश नाडकर्णी, अध्यक्ष, सेबी यांच्या हस्ते बाल मोहन विद्यामंदिर, दादर येथे प्रकाशन. उपस्थित मान्यवर श्री द. म. सुकथनकर राज्याचे माजी मुख्य सचिव व श्री सुरेश प्रभू, अध्यक्ष सारस्वत बँक.
संस्थेची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० (१९५० चा मुंबई अधिक्रमांक २९) अन्वये नोंदणी. नोंदणी क्रमांक: ई - १३३६४ (मुंबई)
गुढी पाडवा - सुप्रसिद्ध साहित्यिक श्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सारस्वत चैतन्याच्या प्रथम अंकाचे बालमोहन विद्यामंदिर दादर येथे प्रकाशन.
प्रकाशने :

५. सारस्वत परिचय - १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या धर्तीवर व आपल्या सारस्वतांच्या मागणीनुसार सारस्वतांची आडनावे, गोत्रे, ज्ञातिघटक, कुलदैवते व ठिकाणे ह्यांची अद्ययावत माहिती सारस्वत परिचय या ग्रंथात दिली आहे. सर्व माहितीची एकत्रित उपलब्धता तीही मराठी व इंग्लिश भाषेत हे या ग्रंथाचे वैशिष्टय आहे. शिवाय सारस्वत संस्था, मठ, देवालये यांची माहिती यात अंतर्भूत आहेतच. १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या सध्या प्रति उपलब्ध नाहीतच. शिवाय नव्या सुधारीत आवृत्तीलाही इतका चांगला प्रतिसाद मिळाला आहे की त्याच्याही आता ठराविक प्रती शिल्लक आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयीन नंबरवर संपर्क करा.

४. सारस्वत चैतन्य त्रैमासिक: १९८६ पासून अव्याहतपणे दर तीन महिन्यांना प्रसिद्ध होणारे हे त्रैमासिक वाचकांमध्ये आपल्या दर्जेदार मजकुराने व सारस्वतांमधील विविध घडामोडीचा वेध घेणारे म्हणून वाचकप्रिय आहे.

३. मी ची शोधयात्रा - मैय्याइच्या सान्निध्यात - लेखक अशोक सिनकर प्रस्तुत पुस्तक, लेखकाच्या ७० दिवसांच्या नर्मदेभोवती केलेल्या भ्रमंती मध्ये आलेल्या अनुभवावर आधारित आहे. याला श्री मधू मंगेश कर्णिक यांची मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. नेहमीच्या नर्मदा परिक्रमेपेक्षा हे पुस्तक वेगळे आहे. परिक्रमेत येणाऱ्या अनुभवाने, माणुसकीच्या दर्शनाने, शारीरिक त्रासाने व वाटेतल्या अडचणीने मनच कसे पालटू लागते. विचारातच कसा बदल होऊ लागतो नि सुखाचा नि आनंदाचा शोध आपल्याशीच कसा संपतो ह्याचे कथन ह्या पुस्तकात आहे.

२. सारस्वत - भारतीय संस्कृतीचे उपासक - लेखक गो. मं लाड पत्रकार, अर्थतज्ञ व सहकार चळवळीतील अग्रणी असलेले गोविंद मंगेश लाड लिखित पुस्तकाचे संदर्भ ग्रंथ म्हणून खूप महत्व आहे. हा लेखकाच्या निधनानंतर प्रसिद्ध झालेला ग्रंथ आहे. ह्याला श्री. के.ज. पुरोहित उर्फ शांताराम या सुप्रसिद्ध साहित्यिकाची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. शांताराम यांच्या शब्दात ह्या ग्रंथ " सारस्वतांचा इतिहास हा केवळ एका वर्णाचा व जातीचा इतिहास नसून तो भारताच्या इतिहासाचा एक अतिशय महत्वाचा मुलस्थ भाग आहे; अशी लेखकाची धारणा दिसते. ही धारणा शक्य तेवढ्या व्यापक पटावर मांडून दाखवली तर संबंध विवेचन वस्तुनिष्ठ आणि सर्वसंमत होईल असा त्यांचा कयास असावा. हा कयास बरोबर होता हे, संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आपल्याला निर्विवादपणे कळते यात शंका नाही."

१. गौड सारस्वत समाज परिचय ग्रंथ: सारस्वतांची आडनावे, गोत्रे , कुलदैवते ह्यांची एकत्रित उपलब्धता हे या ग्रंथाचे वैशिष्टय आहे. शिवाय सारस्वत संस्था, मठ, देवालये यांची माहिती , सारस्वतांतील व्यक्ती विशेषांचा परिचय यात अंतर्भूत आहे. अशा गोष्टींसह प्रसिद्ध झालेला हा कदाचित पहिलाच ग्रंथ असावा. १९९४ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाच्या सध्या प्रति उपलब्ध नाहीत. नव्या सुधारीत आवृत्तीचे काम प्रगती पथावर आहे.

आश्रयदाते-आधारस्तंभ व्हा

सारस्वत प्रकाशन विश्वस्त संस्था

Copyrights 2018 © Saraswat Prakashan, All rights reserved.
Website Developed By digideas.com